महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

टी 20 विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर, भारत-पाकिस्तान सामना कधी होणार; जाणून घ्या - टी 20 विश्वचषक

T20 World Cup Schedule : आयसीसीनं अमेरिका आणि कॅनडात होणाऱ्या आगामी टी 20 विश्वचषकासाठी वेळापत्रक जारी केलं आहे. विश्वचषकामध्ये भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये आहेत.

T20 World Cup Schedule
T20 World Cup Schedule

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 5, 2024, 8:17 PM IST

मुंबई T20 World Cup Schedule : यावर्षी जूनमध्ये होणाऱ्या आयसीसी टी 20 विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. वेस्ट इंडिज आणि यूएसए मधील एकूण 9 मैदानांवर 2024 च्या टी 20 विश्वचषकात 55 सामने खेळवले जातील.

अंतिम सामना कधी : टी 20 विश्वचषकाचा सलामीचा सामना 1 जून रोजी यजमान यूएसए आणि कॅनडा यांच्यात होणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 26 आणि 27 जून रोजी होणार आहेत. 29 जून रोजी बार्बाडोसमध्ये अंतिम सामना खेळला जाईल. उपांत्य आणि अंतिम सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

टीम इंडियाचं वेळापत्रक :टीम इंडियाला 'अ' गटात आयर्लंड, पाकिस्तान, अमेरिका आणि कॅनडासोबत ठेवण्यात आलंय. भारतीय संघाचे पहिले तीन गट सामने न्यूयॉर्कमध्ये होतील. भारतीय संघ 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. टीम इंडियाचा दुसरा सामना 9 जून रोजी पाकिस्तानशी होणार आहे. तर भारतीय संघ 12 जून रोजी अमेरिकेविरुद्ध तिसरा गट सामना खेळणार आहे. भारताचा शेवटचा गट सामना 15 जून रोजी कॅनडाविरुद्ध होणार आहे.

टी 20 वर्ल्ड कप 2024 चा फॉरमॅट : आगामी टी 20 विश्वचषकात 20 संघांचा समावेश आहे. ही स्पर्धा बाद फेरीसह एकूण 3 टप्प्यात खेळवली जाईल. सर्व 20 संघ प्रत्येकी 5 च्या 4 गटात विभागले जातील. प्रत्येक गटातील टॉप-2 संघ सुपर-8 मध्ये प्रवेश करतील. यानंतर, सर्व 8 संघ प्रत्येकी 4 च्या 2 गटात विभागले जातील. सुपर-8 टप्प्यात दोन्ही गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. दोन संघ उपांत्य फेरीच्या दोन सामन्यांद्वारे अंतिम फेरीत प्रवेश करतील. गेल्या टी 20 विश्वचषकात एकूण 16 संघांनी भाग घेतला होता. त्यापैकी 8 संघांना सुपर-12 टप्प्यासाठी थेट प्रवेश मिळाला होता. पात्रता फेरीतून चार संघांनी सुपर-12 मध्ये प्रवेश केला होता.

विश्वचषकाचे गट :

  • अ गट -भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
  • ब गट - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
  • क गट -न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
  • ड गट -दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड, नेपाळ
  • या 12 संघांना थेट प्रवेश मिळाला

1. वेस्ट इंडिज

2. अमेरिका

3. ऑस्ट्रेलिया

4. इंग्लंड

5. भारत

6. नेदरलँड

7. न्यूझीलंड

8. पाकिस्तान

9. दक्षिण आफ्रिका

10. श्रीलंका

11. अफगाणिस्तान

12. बांगलादेश

  • हे 8 संघ पात्रता फेरीद्वारे आले

13. आयर्लंड

14. स्कॉटलंड

15. पापुआ न्यू गिनी

16. कॅनडा

17. नेपाळ

18. ओमान

19. नामिबिया

20. युगांडा

हे वाचलंत का :

  1. रोहित, विराट अफगाणिस्तानविरुद्ध टी 20 साठी उपलब्ध, कोण नेतृत्व करणार?
  2. धोनीला जिगरी दोस्तानेच लावला चुना, तब्बल 15 कोटींची फसवणूक!

ABOUT THE AUTHOR

...view details