नवी दिल्ली : आयर्लंडच्या जोश लिटलने टी-20 विश्वचषक 2022 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध हॅटट्रिक विकेट ( Ireland Becomes First Team to Take Two HatTricks ) घेतली. असे करून त्याने आपले नाव रेकॉर्ड बुकमध्ये नोंदवले आहे. T20 विश्वचषकाच्या ( T20 World Cup 2022 ) इतिहासात हॅट्ट्रिक घेणारा जोश हा सहावा गोलंदाज ठरला आहे. पुरुषांच्या T20 विश्वचषकात हॅट्ट्रिक घेणारा ऑस्ट्रेलियाचा ब्रेट ली हा पहिला गोलंदाज होता. ब्रेट लीची हॅटट्रिक पुरुषांच्या T20 I फॉरमॅटमध्येही पहिली होती.
आयर्लंडचा कर्टिस कॅम्पर हा T20 विश्वचषक क्रिकेटमध्ये सलग चार चेंडूत चार विकेट घेणारा एकमेव गोलंदाज आहे. 2021 च्या विश्वचषकात त्याने नेदरलँड्सविरुद्ध हा पराक्रम केला होता. अशा प्रकारे आयर्लंड संघ सलग दोन वर्षांत दोन हॅट्ट्रिक घेणारा पहिला संघ ठरला.
पुरुषांच्या T20 विश्वचषकाच्या इतिहासात हॅट्ट्रिक घेतलेल्या गोलंदाजांची संपूर्ण यादी येथे पहा :
ब्रेट ली (ऑस्ट्रेलिया) - 2007 वि बांगलादेश (निकाल: विजयी)
शाकिब अल हसन (कॅच अॅडम गिलख्रिस्ट)
मश्रफी मोर्तझा (ब)
आलोक कपाली (एलबीडब्ल्यू)
कर्टिस कॅम्पर (आयर्लंड) - 2021 विरुद्ध नेदरलँड्स (निकाल : विजयी)
कॉलिन एकरमन (सी नील रॉक)
रायन टेन डोचेट (एलबीडब्ल्यू)
स्कॉट एडवर्ड्स (एलबीडब्ल्यू)
रुलोफ व्हॅन डर मर्वे (ब)
वानिंदू हसरंगा (श्रीलंका) - 2021 वि दक्षिण आफ्रिका (निकाल : पराभव)
एडन मार्कराम (ब)