महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

T20 WC 2021: विराट कोहलीनंतर प्रशिक्षक रवी शास्त्री देखील देणार राजीनामा, दिले संकेत - Ravi Shastri

यूएईमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आपलं पद सोडण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील संकेत शास्त्री यांनी दिले आहे. विराट कोहली देखील टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर टी-20 संघाचे कर्णधारपद सोडणार आहे.

T20 World Cup 2021 : Coach Shastri hints that he might step down after T20 World Cup
T20 WC 2021: विराट कोहलीनंतर प्रशिक्षक रवी शास्त्री देखील देणार राजीनामा, दिले संकेत

By

Published : Sep 18, 2021, 3:37 PM IST

लंडन - भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री देखील टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर आपल्या पदाचा राजीमाना देण्याची शक्यता आहे. खुद्द रवी शास्त्री यांनीच या संदर्भातील संकेत दिले आहे. द गार्जियनशी बोलताना रवी शास्त्री यांना, भारतीय संघासोबतचा मुख्य प्रशिक्षक म्हणून हा टी-20 विश्वकरंडक अखेरचा असेल का? असा सवाल विचारण्यात आला. यावर शास्त्री म्हणाले की, मला देखील अशाच विश्वास वाटत आहे. कारण मला जे हवे होते. ते मी मिळवलं आहे.

रवी शास्त्री म्हणाले की, कसोटी क्रिकेटमध्ये पाच वर्षे अव्वल स्थानावर राहणे. तसेच ऑस्ट्रेलियात दोन वेळा आणि इंग्लंडमध्ये एक वेळा विजय मिळवला. मी मायकल आर्थरटन यांच्याशी बोललो, माझ्या कारकिर्दीत कोरोना काळात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांना त्यांच्याच देशात पराभूत करणे खूप मोठं यश आहे. आम्ही इंग्लंडमध्ये 2-1 ने पुढे राहणे आणि ज्या पद्धतीने लॉर्डस् आणि द ओवलमध्ये खेळ केला तो खास होता.

आम्ही पांढऱ्या चेंडूवर प्रत्येक देशात जाऊन त्या त्या संघांना पराभूत केले आहे. जर आम्ही टी-20 विश्वकरंडक जिंकू शकलो तर ही बाब महत्वपूर्ण राहिल. कोरोना काळात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड देशात पुढे राहणे, ही माझ्यासाठी क्रिकेटमध्ये माझ्या चार दशकातील समाधानकारक क्षण आहे, असे देखील रवी शास्त्री यांनी सांगितलं.

दरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने देखील टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर भारतीय टी-20 संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे आता मुख्य प्रशिक्षक आणि टी-20 कर्णधारपदी कोणाची वर्णी लागते, याची उत्सुकता लागली आहे.

हेही वाचा -मोठी बातमी! विश्वकरंडकानंतर टी-20 संघाचे कर्णधारपद सोडणार, विराट कोहलीने केले जाहीर

हेही वाचा -न्यूझिलंडने पाकिस्तान दौरा रद्द केल्यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डानेही सुरू केला दौऱ्याचा फेरविचार

ABOUT THE AUTHOR

...view details