महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

बिग बॅश लीग : सिडनी सिक्सर्सकडे सलग दुसरे विजेतेपद - बिग बॅश लीग २०२१ लेटेस्ट न्यूज

अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजीस आलेल्या सिडनी सिक्सर्सने पुन्हा जोरदार सुरुवात केली. जेम्स व्हिन्समुळे संघाला चांगली सलामी मिळाली. सलामीवीर जोश फिलिप्स ९ धावांवर बाद झाल्यानंतर जेम्सने एक बाजू सांभाळली. विन्सच्या ९५ धावांच्या खेळीमुळे सिडनीला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्यास मदत झाली.

सिडनी सिक्सर्स
सिडनी सिक्सर्स

By

Published : Feb 7, 2021, 9:59 AM IST

सिडनी -सिडनी सिक्सर्स संघाने बिग बॅश लीगच्या दहाव्या मोसमाचे विजेतेपद पटकावले आहे. सिडनी संघाने सलग दुसर्‍या वर्षी हे विजेतेपद जिंकले. बिग बॅश लीगच्या अंतिम सामन्यात सिडनीने प्रथम फलंदाजी करत पर्थ स्कॉर्चर्सला १८९ धावांचे लक्ष्य दिले. पण पर्थ स्कॉर्चर्सचा संघ निर्धारित २० षटकांत केवळ १६१ धावाच करू शकला.

पर्थ स्कॉर्चर्स

हेही वाचा - भारताच्या गोलंदाजांचा लाजिरवाणा विक्रम, टाकले 'इतके' नो बॉल

अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजीस आलेल्या सिडनी सिक्सर्सने पुन्हा जोरदार सुरुवात केली. जेम्स व्हिन्समुळे संघाला चांगली सलामी मिळाली. सलामीवीर जोश फिलिप्स ९ धावांवर बाद झाल्यानंतर जेम्सने एक बाजू सांभाळली. विन्सच्या ९५ धावांच्या खेळीमुळे सिडनीला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. अंतिम सामन्यात सिडनीसाठी इतर कोणताही फलंदाज खास जादू दाखवू शकला नाही.

लक्ष्याचा पाठलाग करताना पर्थच्या सलामीवीरांनी वेगवान धावा घेत संघाला चांगली सुरुवात दिली. परंतु सिडनी गोलंदाज बर्डने दोन्ही फलंदाज बाद केले. यानंतर पर्थचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत राहिले. सिडनी सिक्सर्सचा गोलंदाज बेन डॉवरिशने ३ तर, बर्ड, क्रिश्चियन व सीन अ‍ॅबॉट यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details