रायपूर -शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या सामन्यात इंग्लंड लेजेंड्स संघाने बांगलादेश लेजेंड्स संघाचा ७ गडी राखून पराभव केला. इंग्लंडकडून कर्णधार केव्हिन पीटरसनने ४२ धावांची शानदार खेळी साकारली.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने २० षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात ११३ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या संघाने ६ षटके राखून ३ गड्यांच्या मोबदल्यात हा सामना जिंकला. इंग्लंडकडून पीटरसनने १७ चेंडूत ७ चौकार व एका षटकाराच्या मदतीने ४२ धावा केल्या. तर डॅरेन मॅडी ३२ आणि गॅव्हिन हॅमिल्टन ५ धावांवर नाबाद राहिले.