लाहोर -गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या कोरोना प्रकरणांमुळे पाकिस्तान सुपर लीगचा हंगाम मध्येच स्थगित करण्यात आला आहे. एका वृत्तानुसार, पीएसएलमध्ये खेळणारे आणखी तीन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यानंतर लीग पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अहवालात पुढे म्हटले आहे की, लीग पुढे ढकलण्याचा निर्णय पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) आणि फ्रँचायझी दरम्यान झालेल्या तातडीच्या बैठकीनंतर घेण्यात आला.
अर्ध्यातच थांबवली पाकिस्तान सुपर लीग...वाचा कारण - psl postponed due to Coronavirus
पीएसएल दरम्यान आतापर्यंत सात जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, त्यातील सहा सदस्य खेळाडू आहेत. या लीगमध्ये एकूण ३४ सामने खेळले जाणार होते. पण, आतापर्यंत केवळ १४ सामने पूर्ण झाले आहेत. पीसीबीने सांगितले की, लीगची बहुतेक प्रकरणे दोन वेगवेगळ्या संघांकडून आली आहेत. १ मार्चला पीएसएलमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण मिळाला होता.
पाकिस्तान सुपर लीग