मुंबई- यूएईमध्ये सुरू झालेल्या टी-20 विश्वकरंडकात 24 ऑक्टोंबरला भारत-पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामना रंगणार आहे. या सामन्याची संपूर्ण देश आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र त्यादरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले वाढले आहेत. दहशतवादी तेथील नागरिकांना लक्ष्य करत आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तानमध्ये होणारा हा सामना रद्द करा, अशी मागणी भाजपा नेते गिरिराज सिंह, तारकिशोर प्रसाद यांनी केली. तर आता हीच मागणी असदुद्दीन ओवैसी आणि संजय राऊत यांनी देखील केली आहे. तर बीसीसीआयने सामना रद्द करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
असदुद्दीन ओवैसी म्हणाले -
एएनआय वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार, ऑल इंडिया मजलिस-ए- इत्तेहादुल मुस्लिमीनचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले की, जम्मू काश्मीरमध्ये आपल्या सैनिकांवर हल्ले करण्यात आले. त्यात अनेक जवान हुतात्मा झाले. तसेच स्थानिकांना देखील दहशतनाद्यांकडून लक्ष्य करण्यात येत आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी याविषयी चकार शब्द देखील काढत नाही. आणि अशात पाकिस्तानसोबत भारताचा सामना होणार आहे. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन 24 ऑक्टोंबरला होणारा भारत-पाकिस्तानमधील होणारा सामना रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
गिरिराज सिंह म्हणाले -