मुंबई - रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा आणि संस्थापक नीता अंबानी यांनी भारतातील महिला क्रिकेटसाठी पाठिंबा जाहीर केला आहे. या दिशेने जिओ आणि रिलायन्स फाऊंडेशन एज्युकेशन अॅण्ड स्पोर्ट्स फॉर ऑल (आरएफ ईएसए) आगामी महिला टी-२० चॅलेंजचे प्रायोजक बनले आहेत. या करारानंतर नीता यांनी नवी मुंबईतील जिओ क्रिकेट स्टेडियममधील सुविधा राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ या स्टेडियममध्ये विनामूल्य चाचण्या घेऊन स्पर्धात्मक सामने खेळू शकतो.
नीता अंबानी म्हणाल्या, "महिला टी-२० चॅलेंज आयोजित करण्यासाठी मी बीसीसीआयचे मनापासून अभिनंदन करते. भारतातील महिला क्रिकेटच्या विकासाच्या दृष्टीने हे एक प्रगतीशील पाऊल आहे. या उपक्रमासाठी सहकार्य केल्याबद्दल मला आनंद आहे. मला माझ्या खेळाडूंवर आणि त्यांच्या क्षमतांवर पूर्ण विश्वास आहे. "