ब्रिस्बेन - इंग्लंडचा फलंदाज जो डेन्लीने बिग बॅश लीगच्या (बीबीएल) दहाव्या सत्रात ब्रिस्बेन हीटशी करार केला आहे. डेन्लीने बीबीएल सात आणि आठमध्ये सिडनी सिक्सर्ससह ११ सामने खेळले आहेत. पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीस तो ऑस्ट्रेलियाला पोहोचेल. दोन आठवडे क्वारंटाइन राहून तो संघात सामील होईल.
बीबीएल : जो डेन्लीचा ब्रिस्बेन हीटशी करार - Joe denly signs with brisbane heat
जो डेन्ली बायो सिक्यूरल बबलच्या समस्यांमुळे माघार घेतलेल्या टॉम बंटनची जागा घेईल. डेन्लीचा संघात समावेश केल्याबद्दल संघाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमान म्हणाले की, डेन्ली हा दबाव परिस्थितीत संयम ठेवणारा खेळाडू आहे.''
बीबीएल : जो डेन्लीचा ब्रिस्बेन हीटशी करार
हेही वाचा -सुरेश रैना इज बॅक!...'या' स्पर्धेत खेळणार असल्याची दिली कबुली
जो डेन्ली बायो सिक्यूरल बबलच्या समस्यांमुळे माघार घेतलेल्या टॉम बंटनची जागा घेईल. डेन्लीचा संघात समावेश केल्याबद्दल संघाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमान म्हणाले की, डेन्ली हा दबाव परिस्थितीत संयम ठेवणारा खेळाडू आहे. आम्हाला परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागेल आणि आपल्या योजनांवर आत्मविश्वास ठेवावा लागेल. आम्ही क्लबमध्ये त्याचे स्वागत करतो."