महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

जेसन होल्डरचा नव्या संघासोबत करार, खेळणार फक्त तीन सामने - jason holder and sydney sixers

२९ वर्षीय होल्डर २० आणि २६ डिसेंबर रोजी सिक्सर्सकडून खेळेल. होल्डर संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्येही खेळला होता. त्याच्या उपस्थितीत सनरायझर्स हैदराबादने चांगल्या कामगिरीचे दर्शन घडवले होते.

jason holder joins sydney sixers for bbl 10
जेसन होल्डरचा नव्या संघासोबत करार, खेळणार फक्त तीन सामने

By

Published : Dec 1, 2020, 1:26 PM IST

Updated : Dec 1, 2020, 6:24 PM IST

सिडनी -बिग बॅश लीगच्या (बीबीएल) दहाव्या हंगामासाठी सिडनी सिक्सर्सने वेस्ट इंडिजच्या कसोटी संघाचा कर्णधार जेसन होल्डरशी करार केला आहे. होल्डर मात्र तीन सामन्यासाठी सिक्सर्स संघात असेस. होल्डर सध्या न्यूझीलंडमध्ये असून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेची तयारी करत आहे. तो या महिन्यात होबार्ट येथे सिक्सर्समध्ये सामील होईल.

जेसन होल्डर
जेसन होल्डर

हेही वाचा -किंग खानने विकत घेतला नवीन क्रिकेट संघ

२९ वर्षीय होल्डर २० आणि २६ डिसेंबर रोजी सिक्सर्सकडून खेळेल. होल्डर संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्येही खेळला होता. त्याच्या उपस्थितीत सनरायझर्स हैदराबादने चांगल्या कामगिरीचे दर्शन घडवले होते. यावर्षी मोइसेस हेन्रिक्स सिक्सर्सचा कर्णधार आहे. आयपीएलमध्येही होल्डर त्याच्याबरोबर खेळला आहे.

Last Updated : Dec 1, 2020, 6:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details