मेलबर्न -ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेम्स फॉक्सनरला सध्या सुरू असलेल्या बिग बॅश लीग (बीबीएल) स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे फॉक्सनरने आपले नाव मागे घेतले.
एका वृत्तानुसार, होबार्ट हरिकेन्सचा अष्टपैलू खेळाडू फॉकनरने बीबीएलमध्ये आपला शेवटचा सामना २७ डिसेंबर रोजी ब्रिस्बेन हीटविरुद्ध खेळला होता. या सामन्यात त्याने केवळ १.४ षटके गोलंदाजी केली आणि तो मैदानाबाहेर गेला.