दुबई- गोलंदाजांनी केलेल्या चमकदार कामगिरीने दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सला १३ धावांनी पराभूत केले आहे. राजस्थानचा संघ १४८ धावांपर्यंत मजल मारु शकला. राजस्थानला १६२ धावांचेही आव्हान पेलवले नाही. राजस्थानकडून बेन स्टोक्सने एकाकी झुंज दिली. परंतू दिल्लीच्या गोलंदाजांसमोर त्यांचा टिकाव लागला नाही. हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला.
राहुल तेवतियाने अखेरच्या षटकापर्यंत मैदानावर टिकून सामन्यात रंगत आणली. तुषार देशपांडेने केलेल्या भेदक माऱ्याने राजस्थानच्या विजयाला सुरुंग लागला.
आज आयपीएल २०२० मध्ये दिल्ली कॅपिटल आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात स्पर्धेतील 30 वा सामना खेळण्यात आला. . कर्णधार श्रेयस अय्यर (53) आणि सलामीवीर शिखर धवन (57) यांनी झळकवलेल्या वैयक्तिक अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीने राजस्थानसमोर विजयासाठी 162 धावांचे आव्हान ठेवले. सुरुवातीला दिल्लीला जोफ्रा आर्चरने दोन धक्के देत बॅकफूटवर ढकलले. त्याने पृथ्वीला डावाच्या पहिल्याच चेंडूवर बाद केले. त्यानंतर त्याने अजिंक्य रहाणेला बाद केलं. दिल्लीची अवस्था 2 बाद 10 अशी झाली होती. तेव्हा धवन-अय्यर जोडीने दिल्लीचा डाव सावरला. त्यांच्या खेळीमुळेच दिल्लीला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. जोफ्रा आर्चरने भेदक मारा करत 3 गडी टिपले.
live Update
- राजस्थानचा निम्मा संघ माघारी
- रियान पराग १ धावा काढून बाद
- राजस्थानला चौथा धक्का..संजू सॅमसन २५ धावा काढून बाद
- राजस्थानला धक्का- कर्णधार स्टिव्ह स्मिथ १ धावा काढून बाद
- राजस्थानच्या फलंदाजीला सुरुवात...जोस बटलर- बेन स्टोक्स जोडी मैदानात
- दिल्लीचे राजस्थानपुढे विजयासाठी 162 धावांचे आव्हान
- दिल्लीच्या २० ओव्हरमध्ये १६१ धावा ७ गडी बाद
- अॅलेक्स कॅरी १४ धावा काढून माघारी
- मार्कस स्टॉइनिस १८ धावा काढून बाद
- कर्णधार श्रेयस अय्यर ५३ धावा काढून बाद
- दिल्लीला आणखी एक धक्का, पृथ्वी शॉ शुन्यावर बाद
- शिखर धवन ५७ धावा काढून बाद
- शिखर-अय्यरची अर्धशतकी भागीदारी, १० षटकात २ बाद
- दिल्लीचे अर्धशकत पूर्ण, कर्णधार अय्यर आणि धवनची फटकेबाजी
- आर्चरचा भेदक मारा, अंजिक्य रहाणे शुन्यावर बाद
- डावाच्या पहिल्याच चेंडूवर दिल्लीला धक्का, पृथ्वी बाद, जोफ्रा आर्चरने घेतली विकेट
- दिल्लीची सलामवीर जोडी पृथ्वी शॉ आणि शिखर धवन मैदानात