लाहोर - दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज आणि आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जचा महत्त्वाचा खेळाडू फॉफ डू प्लेसिस १४नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये (पीएसएल) पदार्पण करणार आहे. प्लेऑफ टप्प्यात प्लेसिस पेशावर झल्मीकडून खेळणार आहे. आयसीसी वर्ल्ड इलेव्हनचा कर्णधार म्हणून डु प्लेसिसने २०१७मध्ये पाकिस्तानला शेवटची भेट दिली होती. आता तो पेशावर झल्मी येथे कायरन पोलार्डची जागा घेईल. पोलार्ड आपल्या वेस्ट इंडिज संघासह न्यूझीलंड दौर्यावर असेल.
कोरोनामुळे पीएसएल स्थगित -
पीएसएल स्पर्धा फेब्रुवारी-मार्चमध्ये खेळली जाते. ही स्पर्धा यावर्षी देखील आयोजित करण्यात आली होती. परंतू कोरोना विषाणूमुळे स्पर्धेतील प्लेऑफचा टप्पा अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आला. आता प्लेऑफचे सामने १४ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत.