ब्रिस्बेन -टी-२० क्रिकेटमधील राजा आणि स्फोटक फलंदाज ख्रिस लिन बिग बॅश लीगमधील (बीबीएल) पुढचे सहा सामने खेळू शकणार नाही. स्नायू ताणले गेल्यामुळे लिन काही दिवस विश्रांती घेईल. बीबीएलमध्ये लिन ब्रिस्बेन हीटकडून खेळतो. तो या संघाचा कर्णधारही आहे.
हेही वाचा -'या' कारनाम्यामुळे स्मिथ अश्विनला आयुष्यभर लक्षात ठेवेल!
एका वृत्तानुसार, २३ डिसेंबर रोजी अॅडलेड स्ट्रायकर्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान झेल घेताना लिनला दुखापत झाली. त्यानंतर लिनचे स्कॅन केले गेले. १४ जानेवारीला होणाऱ्या मेलबर्न रेनेगेड्स विरूद्धच्या सामन्यातून तो पुनरागमन करेल.
दुसरीकडे, लुइस ग्रेगोरीने आपला क्वारंटाइन कालावधी पूर्ण केला आहे. त्यामुळे तो ब्रिस्बेनकडून पुढील सामन्यात खेळू शकतो. लुईस दक्षिण आफ्रिका दौर्यावर असलेल्या इंग्लंड संघाचा एक भाग होता. ब्रिस्बेन हीट आपला पुढील सामना २७ डिसेंबर रोजी होबर्ट हरिकेन्सविरुद्ध खेळणार आहे.