कॅनबेरा - बिग बॅश लीग (बीबीएल) दरम्यान कोरोना प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याबद्दल क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) ब्रिस्बेन हीटचा कर्णधार ख्रिस लिन आणि डॅन लॉरेन्सविरूद्ध चौकशी सुरू केली आहे.
क्रिकेटपटू ख्रिस लिन आणि डॅन लॉरेन्सची होणार चौकशी - बीबीएल कोरोना प्रोटोकॉल उल्लंघन
माध्यमांच्या वृत्तानुसार, लिन आणि लॉरेन्स यांना सोमवारी सिडनी विरुद्धच्या सामन्यात खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु त्याचवेळी त्यांना आपल्या सहकारी खेळाडूंपासून आणि इतर कोणत्याही गोष्टीपासून दूर रहावे लागेल, असे सांगितले गेले आहे.
सामन्यात खेळण्याची परवानगी -
माध्यमांच्या वृत्तानुसार, लिन आणि लॉरेन्स यांना सोमवारी सिडनी विरुद्धच्या सामन्यात खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु त्याचवेळी त्यांना आपल्या सहकारी खेळाडूंपासून आणि इतर कोणत्याही गोष्टीपासून दूर रहावे लागेल, असे सांगितले गेले आहे.
शनिवारी 'प्रेक्षकांच्या संपर्कात' आल्यानंतर दोन्ही खेळाडूंना उर्वरित खेळाडू, कर्मचारी आणि सामन्याधिकाऱ्यांकडून सामाजिक अंतराचे पालन करावे लागेल, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सामन्यापूर्वी सांगितले. सीएचे सुरक्षाप्रमुख सीन कॅरोल म्हणाले, "सार्वजनिक, खेळाडू, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि बायो सिक्योर हबची अखंडता राखण्यासाठी स्पर्धेदरम्यानचा प्रवास कमी करण्यात यावा.''