महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Suryakumar Yadav Catch Video : सूर्यकुमार यादवला फिन ऍलनचा झेल टिपताना पाहून सगळेच आवाक, चाहत्यांकडून कौतूकाचा वर्षाव - फिन ऍलनचा झेल

अहमदाबादमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात सूर्यकुमार यादवने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. सूर्यकुमार यादवने हवेत झेप घेत अप्रतिम झेल टिपला, न्यूझीलंडचा संघासह सर्व क्रिकेट प्रेमी त्याची तत्परता पाहून थक्क झाले.

Suryakumar Yadav Catch
सूर्यकुमार यादव

By

Published : Feb 2, 2023, 8:23 AM IST

अहमदाबाद ( गुजरात ) :अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 20 षटकात 4 गडी गमावून 234 धावांच आव्हान भारताने न्यूझीलंड संघाला दिले. लक्ष्य पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरलेला न्यूझीलंड संघ सुरुवातीपासूनच डळमळताना दिसला. पहिल्या षटकात न्यूझीलंड संघाने सुरुवातीलाच आपली पहिली विकेट गमावली होती. न्यूझीलंडने ही विकेट फलंदाज फिन ऍलनच्या रूपाने गमावली.

सूर्यकुमार यादव सूपरमॅन :लक्ष्य गाठण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड संघाने पहिल्याच षटकाच्या चौथ्या चेंडूवरच एक विकेट गमावली होती. या सामन्यात हार्दिक पांड्यासोबत सूर्यकुमार यादवनेही उत्तम कामगिरी दाखवली. चपळाई दाखवत सूर्यकुमार यादवने स्लिपमध्ये हवेत न्यूझीलंडच्या फिन ऍलनचा झेल टिपला. सूर्याची एनर्जी पाहून न्यूझीलंडचा संघ अवाक झाला होता. बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवर त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. सूर्यकुमार यादव हवेत उंच उडी मारून झेल कसा पकडतो आणि झेल घेतल्यानंतर तो जमिनीवर कोसळतो हे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. त्याचवेळी फिन अ‍ॅलन 4 चेंडूत 3 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

शुभमन गिलने टी 20 मध्ये पहिले शतक झळकावले :या सामन्यात टीम इंडियाचा स्टार सलामीवीर फलंदाज शुभमन गिलने टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील पहिले शतक झळकावले आहे. गिलने 63 चेंडूत 12 चौकार आणि 7 षटकारांसह 126 धावा केल्या आहेत. त्यानंतर गिलचा स्ट्राईक रेट 200 होता. भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा शुभमन गिलने नवा रेकॉर्ड बनवला आहे. तो विराट कोहलीनंतरचा पाचवा फलंदाज ठरला आहे ज्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावले आहे. यासह गिलने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये भारतीय संघासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. याआधी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 122 धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता.

नावावर विक्रमांची नोंद :भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या फॉर्मात आहे. प्रत्येक सामन्यागणिक त्याच्या नावावर आता विक्रमांची नोंद होत आहे. सध्याच्या घडीला सूर्यकुमार हा आयसीसी च्या टी २० आंतरराष्ट्रीय रँकिंगमध्ये अव्वल स्थानी विराजमान आहे. त्याची सर्वोत्तम रेटिंग ९१० आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी २० मालिकेच्या पहिल्या सामन्यात ४७ धावांची खेळी करून त्याचा हवेतील झेल लक्षणीय ठरला.

हेही वाचा :India vs New Zealand T20 : भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय! शुभमन गिलची 126 धावांची नाबाद फटकेबाजी

ABOUT THE AUTHOR

...view details