उज्जैन : मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 24 जानेवारीला इंदूरमध्ये होणार आहे. सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंनी उज्जैनमध्ये बाबा महाकालचे दर्शन घेतले. सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाला नमस्कार केला. भारतीय क्रिकेटपटूने ऋषभ पंत लवकर बरा व्हावा यासाठी बाबा महाकालकडे प्रार्थना केली. सूर्याने सांगितले की, त्याचा भाऊ ऋषभ लवकर बरा होऊन मैदानात परतावा, अशी प्रार्थना केली आहे.
ऋषभवर उपचार सुरू आहेत :भेटीनंतर सूर्यकुमार यादव म्हणाला, 'आम्ही न्यूझीलंडविरुद्धची मालिका आधीच जिंकली आहे, आता इंदूरमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची वाट पाहत आहोत.' तो म्हणाला की, ऋषभच्या अभावामुळे संघाला त्रास होत आहे. तो लवकरच बरा होऊन संघात परतावा, म्हणून आम्ही महाकालाच्या दरबारात आलो आहे. ऋषभ पंत 30 डिसेंबर 2022 रोजी रुरकीजवळ एका रस्ता अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्यांच्यावर उत्तराखंडमधील मॅक्स रुग्णालयात काही दिवस उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना मुंबईतील एचएम रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले. डॉ. दिनशॉ पारडीवाला यांनी गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. ऋषभला किमान एक वर्ष क्रिकेटपासून दूर राहावे लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.