दुबई: भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या टी-20 मालिकेत उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. सूर्यकुमारने तिसर्या टी-20 सामन्यातही शानदार खेळी केली. आता त्याचा जबरदस्त फायदा झाला आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या टी-20 ( Latest ICC T20 Batters Rankings ) फलंदाजांच्या क्रमवारीत सूर्यकुमार यादव दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला ( Suryakumar Yadav second in T20 rankings ) आहे.
आता फक्त पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम ( Captain Babar Azam ) त्याच्या पुढे आहे. दोन्ही खेळाडूंमध्ये फक्त दोन रेटिंग गुणांचा फरक आहे. सूर्यकुमार यादवनेही पुढील दोन टी-20 सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली, तर त्याला नंबर 1 फलंदाज बनण्याची संधी आहे. सूर्यकुमार यादव हा टी-20 क्रमवारीतील एकमेव भारतीय फलंदाज आहे, ज्याचा टॉप-10 मध्ये समावेश आहे.