मुंबई - भारताचा माजी फलंदाज सुरेश रैनाने मंगळवारी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. यापूर्वी १५ ऑगस्ट २०२० रोजी रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. रैना एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली 2011 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होता. आगामी देशांतर्गत हंगामात सुरेश रैना उत्तर प्रदेशकडून खेळणार नाही.
निवृत्तीची घोषणा करताना रैनाने ट्विट केले की, "माझ्या देशाचे आणि राज्याचे उत्तर प्रदेशचे प्रतिनिधीत्व करणे माझ्यासाठी अत्यंत सन्मानाची गोष्ट आहे. मी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून माझी निवृत्ती जाहीर करू इच्छितो. मी बीसीसीआय व उत्तर प्रदेश क्रिकेट असोशिएनचे आभार मानतो. चेन्नई आयपीएल, राजीव शुक्ला सर आणि माझ्या सर्व चाहत्यांचा पाठिंबा आणि माझ्या क्षमतेवर अढळ विश्वास."