महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL 2022 Updates: आयपीएलचा पंधरावा हंगाम सूर्यकुमार यादवच्या दृष्टीने असणार खास - माजी खेळाडू सुनील गावस्कर - सूर्यकुमार यादवच्या बातम्या

दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर ( Veteran batsman Sunil Gavaskar ) यांनी IPL 2022 सुरू होण्यापूर्वी सूर्यकुमार यादवचे कौतुक केले आहे. त्यांनी सुर्यकुमार यादवचे कौतुक करताना एक मोठे वक्तव्य केले आहे. ज्यानुसार त्याला ऑस्ट्रेलिया होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत खेण्यासाठी भारतीय संघात संधी मिळेल.

Suryakumar Yadav
Suryakumar Yadav

By

Published : Mar 25, 2022, 5:13 PM IST

मुंबई:आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला केकेआर विरुद्ध सीएसके ( KKR vs CSK ) यांच्यातील सामन्याने होणार आहे. हा सामना शनिवारी (26 मार्च) वानखेडे स्टेडियमवर मुंबई येथे होणार आहे. या सामन्याला संध्याकाळी साडेसातला सुरुवात होईल. त्या अगोदर भारताचे माजी खेळाडू सुनील गावस्कर ( Former player Sunil Gavaskar ) यांनी सुर्यकुमार यादवबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. त्यांच्या मते आयपीएलच्या पंधराव्या हंगामात ( Fifteenth season of IPL ) पुन्हा एकदा शानदार कामगिरी करुन, सूर्यकुमार यादवला भारतीय संघात आपले स्थान बळकट करण्याची संधी असणार आहे.

आयपीएल स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians most successful team ) संघाने आतापर्यं पाचवेळा विजेतेपद पटकावले आहे. या संघाचा यंदाचा पहिला सामना रिषभ पंतच्या नंतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स सोबत होणार आहे. हा सामना 27 मार्चला दुपारी साडेतीन वाजता ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघातील सुर्यकुमार यादवच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष्य असणार आहे. कारण मागील हंगामात त्याने दमादार प्रदर्शन केले होते.

माजी खेळाडू सुनील गावस्कर शुक्रवारी म्हणाले, सूर्यकुमार यादवने ( Batsman Suryakumar Yadav ) गेल्या मोसमात चांगली कामगिरी केली होती आणि भारतीय संघात आपले स्थान निश्चित करण्यासाठी, आयपीएल 2022 ही त्याच्यासाठी या हंगामात पुन्हा चांगली कामगिरी करण्याची उत्तम संधी आहे. टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ मुख्यत्वे आयपीएलच्या कामगिरीवर ठरवला जातो. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला जाणार्‍या संघात निवड होण्याची शक्यता वाढवण्यासाठी यादवला ही चांगली संधी मिळाली आहे.

ऑस्ट्रेलियन फलंदाज डेव्हिड वॉर्नरबद्दल ( Australian batsman David Warner ) बोलताना गावस्कर म्हणाले, वॉर्नरच्या कारकिर्दीच्या या टप्प्यावर त्याला स्वतःशिवाय इतर कोणासाठी काही सिद्ध करण्याची गरज नाही. मागील वर्ष त्याच्यासाठी चांगले नव्हते, परंतु यावेळी तो दिल्ली कॅपिटल्ससाठी चांगली कामगिरी करेल.

ABOUT THE AUTHOR

...view details