नवी दिल्ली :श्रीलंकेचा क्रिकेटर आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फिरकीपटू वनिंदु हसरंगा विवाहबंधनात अडकला आहे. त्याने त्याची गर्लफ्रेंड विंध्यासोबत लग्न केले आहे. हसरंगा आणि विंध्याच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हसरंगा त्याची गर्लफ्रेंड विंध्या पद्मपेरुमासोबत बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होता. हसरंगाचे चाहते सतत त्याच्या फोटोवर कमेंट करून त्याचे अभिनंदन करत आहेत. या कपलचा फोटो इंटरनेटवर खूप ट्रेंड करत आहे. लोकांना हा फोटो खूप आवडला आहे. चाहते त्याला शुभेच्छा देत आहेत.
स्टार कपलने लग्न केले : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्यांच्या ट्विटर हँडलवरून स्टार फिरकीपटू वनिंदु हसरंगाचा आणि विंध्यासोबतची एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये हसरंगासोबत त्याची पत्नी विंध्या पद्मपेरुमा दिसत आहे. हसरंगा अनेक दिवसांपासून विंध्याला डेट करत होता. आता या स्टार कपलने लग्न केले आहे. या खास प्रसंगी, दिग्गज क्रिकेटपटू आणि त्यांचे चाहते वनिंदु हसरंगा-विंध्या पद्मपेरुमा यांच्या लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून त्यांचे अभिनंदन केले आहे. लग्नानंतर हसरंगाने पत्नीसोबत फोटोशूटही केले आहे. क्रिकेटर आणि आरसीबीनेही हेच फोटो शेअर केले आहेत. त्यांच्या या फोटोला भरपूर लाईक्स मिळाल्या आहे.