पल्लेकेले : भारत आणि श्रीलंका महिला संघात ( Sri Lanka Women vs India Women ) पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा चार गडी राखून पराभव ( India Women won by 4 wickets )केला. भारतासमोर विजयासाठी 172 धावांचे लक्ष्य होते, ते भारतीय महिला संघाने सहा गडी गमावून पूर्ण केले.
भारताकडून शेफाली वर्माने 35, हरमनप्रीत कौरने 44 आणि हरलीन देओलने 34 धावा केल्या. मात्र, एका वेळी भारताच्या संघाने 138 धावांवर 6 विकेट गमावल्या होत्या.
तत्पूर्वी, श्रीलंका संघाची कर्णधार चमीरा अटापट्टूने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली नाही आणि केवळ 13 धावांच्या स्कोअरवर पहिला धक्का बसला. पहिली विकेट म्हणून कॅप्टन अटापट्टूला रेणुका सिंगने दोन धावांवर बाद केले. अवघ्या 16 धावा जोडल्यानंतर श्रीलंकेला दुसरा धक्का बसला.
त्याचवेळी हसिनी परेराने तिसऱ्या विकेटसाठी 34 धावांची निश्चितच भर घातली. मात्र 63 च्या स्कोअरवर 37 धावा करून परेरा बाद झाला. त्यानंतर वेळोवेळी श्रीलंकेच्या विकेट पडत राहिल्या आणि 48.2 षटकांत केवळ 171 धावा करून संपूर्ण संघ सर्वबाद झाला. भारताकडून रेणुका सिंग आणि दीप्ती शर्माने 3-3, तर पूजा वस्त्राकरने 2 गडी बाद केले.
हेही वाचा -INTERVIEW: ऑलिम्पिक चॅम्पियन होण्याचे दडपण जाणवले नाही; डायमंड लीगच्या कामगिरीवर नीरज चोप्रा म्हणाला