कोलंबो:श्रीलंकेच्या राष्ट्रीय क्रिकेट संघासाठी नवीन क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीलंकेने अँटोन रॉक्स यांची राष्ट्रीय क्षेत्ररक्षण प्रशिक्षक ( Anton Rocks appoints fielding coach ) म्हणून नियुक्ती केली आहे. अँटोन रॉक्स हे 7 मार्चपासून क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारतील. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (SLC) गुरुवारी याबाबत माहिती दिली.
दक्षिण आफ्रिकेसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणारे आणि नेदरलँड्सच्या पुरुष संघाचे प्रशिक्षक असलेले रॉक्स सर्व राष्ट्रीय संघ आणि उच्च कामगिरी केंद्रासाठी क्षेत्ररक्षणाची जबाबदारी सांभाळतील. ते पूर्वी नॉटिंगहॅमशायर काउंटीसाठी सहाय्यक क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम करत होते. उच्च कामगिरी केंद्राच्या पुढील पुनर्रचनेचा एक भाग म्हणून, श्रीलंका क्रिकेटच्या कार्यकारी समितीने 'ए', अंडर-19 आणि उदयोन्मुख संघांसाठीही नियुक्त्या केल्या आहेत.