हैदराबाद : श्रीलंकेचा क्रिकेट संघ ( Sri Lankan cricket team ) काही दिवसात भारत दौऱ्यावर येणार आहे. या दोन्ही संघात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. त्यानंतर दोन्ही संघात दोन कसोटी सामन्यांची मालिका पार पडणार आहे. तत्पुर्वी टी-20 मालिकेसाठी श्रीलंकेचा 18 सदस्यीय संघ जाहीर केला ( Sri Lanka 18-member squad announced ) आहे. या मालिकेला 24 फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे.
श्रीलंकेचा संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात संघात सहभागी असलेल्या भानुका राजपक्षेची भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेसाठी त्याची निवड करण्यात ( Sri Lanka team for T20 series ) आली नाही. तसेच अविष्का फर्नांडो, नुवान तुषारा आणि रमेश मेंडिस दुखापतींमुळे भारताविरुद्धच्या T20 सामन्याला मुकणार असून ते मायदेशी परतणार आहेत.
कोविड-19 ची लागण झाल्यामुळे या दौऱ्यातील शेवटचे तीन सामने खेळू न शकलेला लेग-स्पिनर वानिंदू हसरंगा ( Leg-spinner Wanindu Hasaranga ) भारताविरुद्ध तीन सामन्यांची मालिका खेळणार आहे. श्रीलंका क्रिकेटने 21 वर्षीय अनकॅप्ड ऑफस्पिनर आशियान डॅनियलचाही संघात समावेश केला आहे. श्रीलंकेचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून सरळ भारत दौऱ्यावर येणार आहे.