महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

SRH vs RCB : हातचा सामना गमावल्यानंतर हैदराबादच्या संघ मालकाची लेक झाली दु:खी, फोटो व्हायरल - हैदराबाद वि. बंगळुरू सामना

बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर हैदराबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर चांगलाच निराश झाला होता. मात्र याचवेळी मैदानावर उपस्थित असलेली एक तरुणी वॉर्नरपेक्षा जास्त दु:खी झाली होती. ही तरुणी हैदराबाद संघाचे मालक कलानिधी मारन यांची मुलगी काव्या मारन होती.

SRH Mystery Girl Kavya Marans Heartbroken Pictures go Viral on Social Media After RCB Beat SRH in IPL 2021 Game
SRH vs RCB : हातचा सामना गमावल्यानंतर हैदराबादच्या संघ मालकाची लेक भडकली, फोटो व्हायरल

By

Published : Apr 15, 2021, 5:19 PM IST

चेन्नई - आयपीएलमध्ये बुधवारी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने सनरायजर्स हैदराबाद संघाचा ६ धावांनी पराभव केला आहे. स्पर्धेतील हैदराबादच्या संघाचा हा सलग दुसरा पराभव ठरला. बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर हैदराबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर चांगलाच निराश झाला होता. मात्र याचवेळी मैदानावर उपस्थित असलेली एक तरुणी वॉर्नरपेक्षा जास्त दु:खी झाली होती. ही तरुणी हैदराबाद संघाचे मालक कलानिधी मारन यांची मुलगी काव्या मारन होती.

कॅमेरामॅनने सामन्यादरम्यान काव्या मारनचे अनेक फोटो कॅमेरात टिपले आहेत. तिचे सामन्यादरम्यानचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काव्या मारनने चेन्नईमधून आपले एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. ती मागील काही वर्षांपासून मैदानात येऊन हैदराबाद संघाला समर्थन करत आहे.

सनरायजर्स हैदराबाद संघाने बुधवारी हातचा सामना गमवला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने विजयाची आसच सोडली होती. परंतु, १७व्या षटकात शाहबाज अहमदने त्यांना नवसंजीवनी दिली. अहमदने त्या षटकात तीन महत्त्वाच्या विकेट्स घेत सामन्याला कलाटणी दिली आणि बंगळुरूने सामना ६ धावांनी सामना जिंकला. बंगळुरूच्या ८ बाद १४९ धावांच्या प्रत्युत्तरात हैदराबादला ९ बाद १४३ धावा करता आल्या.

हेही वाचा -कगिसो रबाडाचा क्वांरटाईन कालावधी पूर्ण; राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळण्यास सज्ज

हेही वाचा -विस्डेन पुरस्कार : विराट कोहली गेल्या दशकाचा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू

ABOUT THE AUTHOR

...view details