जोहान्सबर्ग:दक्षिण आफ्रिकेची फलंदाज मिग्नॉन डू प्रीझने ( Mignon du Preez Announces Retirement ) गुरुवारी कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. 32 वर्षीय डू प्रीझने दक्षिण. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयाचे कारण म्हणजे, टी-20 क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि कुटुंबासोबत अधिक वेळ घालवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. मिग्नॉन डू प्रीझने आफ्रिकेसाठी 154 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याचबरोबर 2014 मध्ये भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यातही तिने सहभाग घेतला होता.
मिग्नॉन डू प्रीझने ( Batter Mignon du Preez ) म्हणाली, मला आतापर्यंत चार आयसीसी एकदिवसीय विश्वचषकात खेळण्याचा बहुमान मिळाला आहे. या माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान आठवणी आहेत. तरी आता मला माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवायला आवडेल आणि मी लवकरच माझे स्वतःचे कुटुंब सुरू करू इच्छिते. ती पुढे म्हणाली, मला वाटते की, खेळाच्या दीर्घ स्वरूपातून निवृत्तीची घोषणा करण्याची आणि टी-20 क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यामुळे न्यूझीलंडमध्ये नुकताच झालेला विश्वचषक पूर्ण झाल्यानंतर मी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.
मधल्या फळीतील फलंदाज डु प्रीझने ( Middle-order Batter du Preez ) 2007 मध्ये युवा म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 154 एकदिवसीय सामने खेळण्याव्यतिरिक्त, ती त्यापैकी 46 सामन्या मध्ये दक्षिण आफ्रिका संघाची कर्णधार होती. तिने 2016 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा आघाडीची धावा करणारी खेळाडू म्हणून 18 अर्धशतके आणि दोन शतकांसह 32.98 च्या सरासरीने 3,760 धावांसह, आयर्लंडविरुद्ध नाबाद 116 च्या सर्वोच्च धावसंख्येसह आपल्या एकदिवसीय कारकीर्दीत समावेश केला आहे.
डु प्रीझ म्हणाले, "मला वाटते की दक्षिण आफ्रिकेतील महिला क्रिकेट खूप चांगल्या स्थितीत आहे. त्यामुळे आता वेळ आली आहे की, पुढील पिढीच्या रोमांचक क्रिकेटपटूंना आमचा हा सुंदर खेळ खेळण्याची परवानगी द्यावी." माझ्या एकदिवसीय कारकिर्दीत सतत पाठिंबा दिल्याबद्दल मी क्रिकेट दक्षिण आफ्रिका बोर्डाचे आभार मानू इच्छिते. तसेच क्रिकेट दक्षिण आफ्रिका (Cricket South Africa) मुख्य कार्यकारी अधिकारी फोलेत्सी मोसेकी यांनी डु प्रीझचे तिच्या कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांतील सेवेबद्दल आभार मानले आणि तिचे वर्णन महिला क्रिकेटचे प्रणेते म्हणून केले.
हेही वाचा -IPL 2022 Latest Upadates : जसप्रीत बुमराह आणि नितीश राणावर बीसीसीआयची मोठी कारवाई; जाणून घ्या, काय आहे प्रकरण