जोहान्सबर्ग:भारतात होणाऱ्या पाच सामन्यांच्या T20I मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाची घोषणा करण्यात ( South Africa squad announced ) आली आहे. संघाचे नेतृत्व टेंबा बावुमा करणार आहे. 2021 च्या अखेरीस आयसीसी टी-20 विश्वचषकानंतर हा संघ प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणार आहे. त्यांचा सामना 9 ते 19 जून दरम्यान भारतीय संघाशी होणार आहे. 21 वर्षीय यष्टीरक्षक-फलंदाज ट्रिस्टन स्टब्सला प्रथमच या संघात संधी देण्यात आली आहे.
मधल्या फळीतील फलंदाज ट्रिस्टन स्टब्सने ( Batsman Tristan Stubbs ) गेल्या मोसमात क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) टी-20 चॅलेंजमध्ये आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले होते त्याने सात डावात 48.83 च्या सरासरीने 293 धावा केल्या आणि 23 षटकारांसह 183.12 च्या स्ट्राइक रेटने 293 धावा केल्या होत्या. इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 साठी मुंबई इंडियन्सच्या संघात सामील होण्यापूर्वी तो झिम्बाब्वेमधील दक्षिण आफ्रिका 'अ' संघाचा भाग होता. इतर निवड झालेल्या खेळाडूंमध्ये डिसेंबर 2021 पासून दुखापतीतून सावरणारा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्टजे आणि फलंदाज रीझा हेंड्रिक्स आणि हेनरिक क्लासेन पुनरागमन करत आहे.
क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने सांगितले की, नॉर्टजेला वैद्यकीयदृष्ट्या खेळण्यासाठी मंजुरी मिळाली आहे आणि सध्या तो आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना चांगली गोलंदाजी करत आहे. 2017 मध्ये संघाच्या इंग्लंड दौऱ्यानंतर वेन पारनेलही प्रथमच टी-20 साठी पुनरागमन करत आहे. केशव महाराज आणि नंबर 1 टी-20 गोलंदाज तबरेझ शम्सी व्यतिरिक्त, उर्वरित संघात क्विंटन डी कॉक, एडन मारक्ररम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, ड्वेन प्रिटोरियस, कगिसो रबाडा, रॉसी व्हॅन डर डुसेन मार्को जेन्सन हे आयपीएल खेळत असलेले खेळाडू आहेत.
सीएसएचे निवडकर्त्यांचे समन्वयक व्हिक्टर म्पित्सांग ( CSA selectors coordinator Victor Mpitsang ) म्हणाले, "हा एक प्रोटीज संघ आहे, जो त्यांनी बर्याच काळापासून पाहिलेला नाही. आयपीएलमध्ये वेगवेगळ्या संघातील आफ्रिकन खेळाडूंचा समावेश केल्याने, आमच्याकडे एक संघ असेल जो स्पर्धा करण्यासाठी सज्ज असेल आणि ज्या परिस्थितीत आम्ही खेळू त्यामध्ये आम्हाला व्यापक अनुभव असेल.