महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती - डेल स्टेन निवृत्ती डेट

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

South Africa legend Dale Steyn announces retirement from cricket
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

By

Published : Aug 31, 2021, 8:04 PM IST

मुंबई - दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. स्टेनने ट्विट करत याची घोषणा केली. डेल स्टेन क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात दक्षिण आफ्रिकेकडून खेळला आहे.

डेल स्टेल मागील काही काळापासून सतत दुखापतीने ग्रस्त होत होता. यामुळे त्याने 2019 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. यानंतर आता त्याने सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. स्टेनने म्हणतो की, मागील वर्षापेक्षा यंदाचे वर्ष चांगले राहिल, असाच विचार करत होतो. पण हा प्रवास खूप लांबला. पण मी यातून बाहेर पडण्यासाठी खूप प्रयत्न केले. प्रशिक्षक, सामना, प्रवास, विजय, पराभव या सारख्या गोष्टींत 20 वर्ष गेले. सांगण्यासाठी खूप आठवणी आहेत. आभार मानन्यासारखे अनेक जण आहेत.

मला पसंत असलेल्या खेळातून मी आज अधिकृतरित्या निवृत्ती घेत आहे. मी संघ, पत्रकार आणि चाहत्याचे आभार मानतो. हा एक अविश्वसणीय प्रवास होता, असे डेल स्टेनने त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, डेल स्टेनच्या वेगवान गोलंदाजीची जगभरातील मातब्बर फलंदाजांच्या मनात भिती होती. स्टेनने 93 कसोटी सामन्यात 439 गडी बाद केले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावे 125 सामन्यात 195 विकेट आहेत. तर 47 टी-20 सामन्यात त्याने 64 फलंदाजांना माघारी धाडलं. स्टेन आयपीएलसह जगभरातील वेगवेगळ्या लीगमध्ये खेळला आहे.

हेही वाचा -BCCI ने नव्या IPL संघासाठी तब्बल 'इतक्या' कोटीची बेस प्राईस केली निश्चित

हेही वाचा -Ind vs Eng : पॉल कॉलिंगवूड यांनी भारतीय संघाच्या वापसीबद्दल काय म्हटलं?

ABOUT THE AUTHOR

...view details