नवी दिल्ली : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील वनडे आणि टी-20 मालिका (INDv WI ODI and T20 series) पार पडल्यानंतर भारत आणि श्रीलंका संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. याबाबत बोलताना बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (BCCI President Sourav Ganguly) म्हणाले, श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत गुलाबी चेंडूची कसोटी बंगळुरूमध्ये खेळवली जाणार आहे.
फेब्रुवारीच्या अखेरीस आणि मार्चच्या सुरुवातीला भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन टी-20 आणि दोन कसोटी सामन्यांचे आयोजन करणार आहे. तसेच भारतीय संघ गुलाबी चेंडू कसोटी खेळण्याची ही तिसरी वेळ असणार आहे. या अगोदर भारताने नोव्हेंबर 2019 मध्ये कोलकाता येथे बांगलादेशविरुद्ध गुलाबी चेंडूचा कसोटी सामना (Pink ball Test match) खेळला होता. त्यानंतर फेब्रुवारी 2021 मध्ये अहमदाबादमध्ये इंग्लंडविरुद्ध दुसरा गुलाबी चेंडूचा कसोटी सामना पार पडला होता. तसेच विराट कोहली कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत भारताचा नवा कर्णधार रोहित शर्मा असणार आहे.