भारताचा माजी खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा ( Master blaster Sachin Tendulkar ) आज 49 वा वाढदिवस आहे. सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव या नावाने देखील ओळखले जाते. 2013 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही या दिग्गजाची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही. आजही त्यांच्या नुसत्या उपस्थितीने स्टेडियममध्ये ‘सचिन-सचिन’चा आवाज घुमतो. सचिनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक विक्रम केले आणि यातील काही विक्रम मोडणे जवळपास अशक्य आहेत.
सचिनचे क्रिकेट क्षेत्रातील योगदान शब्दात वर्णन करता येणार नाही. कारण काही खेळाडूंचा प्रभाव असा असतो की, आपण कधीही त्यांच्या योगादान मोजू शकत नाही. सचिन तेंडुलकरचे व्यक्तिमत्व असे आहे, ज्याचा भारतासह जगभरातील क्रिकेट दिग्गज आणि तरुण आदर करतात. सचिन तेंडुलकरचा जन्म 24 एप्रिल 1973 साली मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. सचिनचे संपूर्ण नाव सचिन रमेश तेंडुलकर आहे. असा हा महान क्रिकेटर आज आपल्या 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्यावर आज सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून सचिन तेंडुलकरवर मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव -
भारतीय संघाचा आणि मुंबई इंडियन्स संघाचा युवा खेळाडू इशान किशनने सचिन तेंडुलकरा ट्विट करुन शुभेच्छा दिल्या आहेत. ज्यामध्ये तो म्हणाला, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सचिन तेंडुलकर पाजी, तुमच्या शब्दांसाठी आणि मार्गदर्शनासाठी सदैव आभारी आहे. तसेच एक फोटो शेअर केला आहे.