हॅमिल्टन:आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेतील 22 वा सामना भारत विरुद्ध बांगलादेश संघात पार पडला. हा सामना भारतीय संघाने 110 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत, बांगलादेश संघाला 230 धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात बांगलादेश डाव 119 धावांवर आटोपला. भारताची सलामीवीर स्मृती मंधानाने या सामन्यात एका विक्रमाची नोंद केली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाच हजार धावा करणारी तिसरी भारतीय महिला -
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 229 धावा केल्या होत्या. यामध्ये भारताच्या सलामीवीर स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा यांनी पहिल्या विकेट्साठी शानदार 74 धावांची भागीदारी केली. ज्यामध्ये स्मृती मंधानाच्या 30 धावांचे योगदान होते. स्मृती मंधानाने या 30 धावा करत आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील 5000 धावांचा टप्पा पार केला आहे. स्मृती मंधाना 5000 धावांचा टप्पा ( 5000 runs of Smriti Mandhana ) पार करणारी भारताची तिसरी महिला खेळाडू ( India's third female player ) ठरली आहे. या अगोदर मिताली राज आणि हरमनप्रीत कौर यांनी पाच हजार धावांचा टप्पा पार केला आहे.