मुंबई - भारतीय क्रिकेटर कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास पुढाकार घेत आहेत. आज सकाळी दीपक चहर आणि सिद्धार्थ कौल यांनी लस घेतली. त्यानंतर भारतीय महिला संघाची मराठमोळी सलामीवीर स्मृती मानधाना, पुरूष संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि दिनेश कार्तिक यांनी लस घेतली.
स्मृती लस घेणारी पहिला महिला खेळाडू -
स्मृती मानधानाने आज कोरोना प्रतिबंधक लस घेतली. लस घेणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली. तिने लस घेतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यासोबत तिने, देशवासियांना लस घेण्याचे आवाहन केलं आहे.
भारतीय महिला क्रिकेटचा संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात उभय संघात १ कसोटी, ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्याची मालिका खेळवण्यात येणार आहे. या दौऱ्याची सुरूवात १६ जूनपासून तर सांगता १५ जुलैला होणार आहे. मानधाना या दौऱ्यासाठी भारतीय संघाची सदस्य आहे. या दौऱ्यानंतर मानधाना 'हंड्रेड टूर्नामेट'मध्ये भाग घेणार आहे. ही स्पर्धा २१ जुलै ते २१ ऑगस्ट या दरम्यान पार पडणार आहे.