मुंबई -भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यावर जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या नजरा आहेत. भारतीय संघाचा पहिला डाव २१७ धावांवर आटोपला आहे. तर न्यूझीलंडने तिसऱ्या दिवसाअखेर २ बाद १०१ अशी सावध सुरूवात केली आहे. आज सामन्याचा चौथा दिवस असून पावसामुळे आजचा खेळ रद्द होण्याची शक्यता दाट आहे. या दरम्यान, भारतीय महिला संघाची मराठमोळी सलामीवीर स्मृती मंधाना सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिचे फोटो चाहते तुफान शेअर करताना पाहायला मिळत आहेत.
इंग्लंडविरुद्धचा एकमात्र कसोटी सामना अनिर्णित
भारतीय महिला क्रिकेट संघ बिस्टोल येथे खेळवण्यात आलेला इंग्लंडविरुद्धचा एकमात्र कसोटी सामना अनिर्णीत सोडवण्यात यशस्वी ठरला. यात स्नेह राणाने अष्टपैलू कामगिरी केली. तिने नाबाद ८० धावांची खेळी करत सामना अनिर्णीत राखण्यात मोलाची भूमिका निभावली. पण तिच्याहून अधिक चर्चा स्मृतीच्या लुक्सची होत आहे.