मुंबई - भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या पूर्णपणे फिट नाही. गोलंदाजी करताना त्याला त्रास होत आहे. आता भारत अ संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पहिलेले आणि बंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अकादमीचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे यांनी हार्दिक बाबतीत ताजे अपडेट दिले आहेत.
पारस म्हाम्ब्रे म्हणाले की, आम्ही हार्दिक पांड्याला जास्त षटके गोलंदाजी करण्यासाठी दबाव देत नाही. आम्ही त्याच्यावर नजर ठेऊन आहोत. हळूहळू बिल्ड अप करणे आवश्यक आहे. हार्दिक संघासाठी मोठी भूमिका निभावतो. त्यामुळे तो गोलंदाजीत चांगल्या पद्धतीने तयार झाला पाहिजे.
आपल्याला सगळ्यांना हार्दिक पांड्याच्या फलंदाजीबद्दल माहितीच आहे. पण यात जर आम्ही त्याची गोलंदाजी जोडली तर तो एक वेगळा ठरतो. यावर आम्ही काम करत आहोत. आम्ही त्याच्या प्रत्येक मजबूत आणि कमकुवत बाबतीत चर्चा करत आहोत. या कामी फिजिओची देखील मदत मिळत आहे, असे देखील म्हाम्ब्रे म्हणाले.
म्हाम्ब्रे पुढे म्हणाले की, हार्दिक पांड्या आयपीएलमध्ये नक्कीच गोलंदाजी करेल, असा विश्वास मला वाटत आहेत. पण त्याचा वापर कसा करायचा हे मुंबई इंडियन्सचा संघ ठरवेल.