होव्ह : भारतीय फलंदाज शुभमन गिलने ( Shubman Gill ) मंगळवारी ससेक्सविरुद्ध ( Sussex ) ग्लॅमॉर्गनसाठी 119 धावांची शानदार खेळी खेळली. कौंटी चॅम्पियनशिप ( County Championship ) डिव्हिजन दोनमधील हे त्याचे पहिले शतक ( Shubman Gill First Century ) आहे.
गिलने सकाळी 91 पर्यंत आपला डाव वाढवला आणि दुस-या दिवसाच्या आठव्या षटकात डावखुरा वेगवान गोलंदाज सीन हंटच्या चेंडूवर दोन धावा काढून प्रथम श्रेणी कारकिर्दीतील आठवे शतक ( Gills eighth century in his first class career ) पूर्ण केले. 23 वर्षीय भारतीय फलंदाजाने 139 चेंडू खेळले आणि 16 चौकार आणि 2 षटकार मारले. त्यानंतर त्याला ऑफस्पिनर जॅक कार्सनला झेलबाद केले.
ग्लॅमॉर्गन ( Glamorgan ) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आल्यानंतर गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याच्या या शानदार खेळीच्या जोरावर ग्लॅमॉर्गनने पहिल्या दिवशी 3 बाद 221 धावा केल्या. गिल बाद झाला तेव्हा त्याची धावसंख्या पाच विकेट्सवर 277 धावा होती.
गिलचा काउंटी चॅम्पियनशिपमधील हा तिसरा सामना आहे. त्याने पहिल्या सामन्यात वूस्टरशायरविरुद्ध 92 धावा केल्या होत्या, तर मिडलसेक्सविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याला 22 आणि 11 धावाच करता आल्या. 23 वर्षीय शुभमन गिलचे या महिन्यात काऊंटी क्रिकेटमधील पदार्पणाच्या सामन्यात शतक हुकले. ज्यामध्ये त्याने वूस्टरशायरविरुद्ध 92 धावांची खेळी खेळली होती. पण आज (27 सप्टेंबर) त्याने कोणतीही चूक केली नाही आणि शतक झळकावूनच दाखवले.