कटक: अक्षर पटेलला दिनेश कार्तिकच्या अगोदर फलंदाजीसाठी पाठवणे विचित्र वाटू शकते, परंतु आघाडीचा फलंदाज श्रेयस अय्यरने ( Batsman Shreyas Iyer ) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात घेतलेल्या निर्णयाचा बचाव करताना म्हणाला की, दोन धावा (स्ट्राइक रोटेट करण्यसाठी) चोरण्यासाठी परिस्थीती बघून हे असे केले.
ही रणनीती कामी आली नाही आणि अक्षराला ( Batsman Axar Patel ) धावा काढण्यासाठी संघर्ष करावा लागला. 17व्या षटकात तो बाद झाल्याने भारताची धावसंख्या 6 बाद 112 अशी झाली. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कार्तिकच्या नाबाद 30 धावांमुळे भारताला सहा बाद 148 धावांपर्यंत मजल मारता आली.
सामन्यानंतर श्रेयसने पत्रकारांना सांगितले की, आम्ही यापूर्वीही अशी रणनीती अवलंबली होती. अक्षर क्रीजवर उतरला तेव्हा आमच्याकडे सात षटके शिल्लक होती. तो एक-दोन धावा घेऊन स्ट्राइक रोटेट करू शकतो. तो म्हणाला, याशिवाय, नंतर कोणालाही क्रीजवर फटके मारण्याची आणि पहिल्या चेंडूवर फटके मारण्याची गरज नव्हती. डीके (कार्तिक) असे करू शकतो, परंतु 15 षटकांनंतर तो आमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरला आहे, जिथे तो क्रीजवर उतरताच मोठे शॉट्स खेळू शकतो.