नवी दिल्ली :अहमदाबादमध्ये सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यातून भारतासाठी वाईट बातमी आली आहे. श्रेयस अय्यरच्या पाठीत अचानक दुखू लागल्याने तो फलंदाजीसाठी मैदानावर आला नाही. रवींद्र जडेजा बाद झाल्यानंतर श्रेयसला फलंदाजीला यावे लागले मात्र त्याच्या जागी भरत मैदानात आला.
श्रेयस वनडे मालिकेतून बाहेर पडला :अय्यर ( Shreyas Iyer Back Pain ) पाठदुखीमुळे जानेवारीत न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर पडला होता. खबरदारी म्हणून त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमी बंगळुरू येथे पाठवण्यात आले. सध्या विराट कोहली आणि केएस भरत भारतीय डावाचे नेतृत्व करत आहेत. वृत्त लिहिपर्यंत विराटने 88 धावा केल्या होत्या आणि भरतने 24 धावा केल्या होत्या. भारत अजूनही 8 धावांनी मागे :विराट कोहलीच्या शानदार शतकामुळे भारताने पहिल्या डावात 5 गडी गमावून 472 धावा केल्या आहेत. विराट कोहली 135 धावा करून आणि अक्षर पटेल 38 धावा करून क्रीजवर आहे. भारत अजूनही 8 धावांनी मागे आहे.