मुंबई :जगातील सर्वात मोठी टी-20 लीग म्हणून आयपीएल स्पर्धेला ओळखले जाते. या आयपीएल स्पर्धेचा यंदा 15 वा हंगाम ( 15th season of IPL ) खेळला जाणार आहे. तसेच या हंगामाला 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेपूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाकडून मोठी बाातमी माहिती समोर आली आहे. या संघाने दिल्ली कॅपिटल्स फ्रेंचायझीने ( Delhi Capitals franchise ) आयपीएल 2022 या हंगामासाठी शेन वॉटसनला सहाय्यक कोच म्हणून नियुक्त केले आहे.
दिल्ली कॅपिटल्स फ्रेंचायझीने आयपीएल 2022 ( IPL 2022 ) या हंगामासाठी शेन वॉटसनला सहाय्यक कोच म्हणून नियुक्त ( Appointed Shane Watson as assistant coach) करण्यागोदर, 40 वर्षीय रिकी पाँटिंग (मुख्य प्रशिक्षक), प्रवीण अमरे (सहाय्यक प्रशिक्षक), अजित आगरकर (सहाय्यक प्रशिक्षक) आणि जेम्स होप्स (गोलंदाजी प्रशिक्षक) यांचा डीसी कोचिंग स्टाफमध्ये समावेश आहे.
यावर वॉटसन म्हणाला, ''आयपीएल ही जगातील सर्वोत्तम टी-20 स्पर्धा आहे. एक खेळाडू म्हणून माझ्याकडे अविश्वसनीय आठवणी आहेत, सर्वप्रथम राजस्थान रॉयल्सने 2008 साली जिंकले होते, ज्याचे नेतृत्व शेन वॉर्नने केले होते. एक खेळाडू म्हणून माझ्याकडे अतुलनीय आठवणी आहेत. आता मला प्रशिक्षक होण्याची संधी मिळाली आहे. महान रिकी पाँटिंगच्या ( The great Ricky Ponting ) नेतृत्वाखाली काम करण्याची ही उत्तम संधी आहे. एक कर्णधार म्हणून तो एक अप्रतिम लीडर होता आणि आता तो जगातील सर्वोत्तम प्रशिक्षकांपैकी एक आहे. मी डीसीचा भाग होण्यासाठी खरोखरच उत्साहित आहे.