कराची : सध्या पाकिस्तानमध्ये पीएसएलचा ( Pakistan Super League ) थरार सुरु आहे. ही लिग सातत्याने कोण्त्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत असते. दोन दिवसापूर्वीच जेम्स फॉकनर आणि पीएसएल यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. हा वाद मिटण्या अगोदरच पीएसएल आणखी एका कारणाने चर्चेत आली आहे. सध्या एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये पीएसएल सामन्या दरम्यान गोलंदाज एका क्षेत्ररक्षकाला कानशिलात लगावत असल्याचे दिसत आहे.
सोमवारी पीएसएल लीगचा एक सामना खेळला गेला. हा सामना लाहोर कलंदर्स आणि पेशावर जाल्मी ( Lahore Calendars and Peshawar Jalmi Peshawar ) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात पेशवार जाल्मी संघाने प्रथम फलंदाजी करताना 158 धावा केल्या होत्या. त्यानंतर लाहोर कलंदर्स संघाने देखील तितक्याच धावा केल्या. त्यामुळे सामना टाय झाला आणि सुपर ओव्हर खेळवण्यात आली. ज्यामध्ये पेशावर जाल्मी संघाने विजय प्राप्त केला.
तत्पुर्वी लाहोर कलंदर्सच्या गोलंदाज हारिस रऊफने ( Bowler Harris Rouf ) सामन्या दरम्यान, असे एक कृत्य केले. ज्यामुळे तो सध्या खुप चर्चेत आहे. झाले असे की, त्याने विकेट घेतल्यानंतर आपला संघ सहकारी कामरान गुलाम ( Teammate Kamran Ghulam ) याला कानशिलात लगावली. या कामरान गुलामने हारिस रऊफच्या गोलंदाजी दरम्यान पेशावर जाल्मी संघाच्या हजरतुल्लाह जजई याचा झेल सोडला होता. त्यामुळे हारिस रऊफने हे लाजिरवाणे कृत्य केले. ज्यामुळे आता त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे.
दरम्यान त्याच षटकात हारिस रऊफने हजरतुल्लाह जजईला ( Batsman Hazratullah Jajai ) फवाद अहमदच्या हाती झेल देण्यास भाग पाडत त्याला बाद केले. त्यानंतर विकेट घेतल्याचा आनंद सर्वजण व्यक्त करत होते. त्यावेळी कामरान गुलाम देखील सेलिब्रेशनला आला असता, हारिस रऊफने कामराल गुलामला कानशिलात लगावाली. मात्र यावर कामरान गुलाम यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.