हैदराबाद:पाकिस्तानचा माजी क्रिकेटर दानिश कनेरियाने ( Former Pakistan cricketer Danish Kaneria ) शाहिद आफ्रिदीला चोख प्रत्युत्तर दिले आहे. कनेरिया म्हणाला, भारत आपला शत्रू नाही. उलट ते त्याचे शत्रू आहेत, जे लोकांना धर्माच्या आधारे भडकावतात. कनेरिया आफ्रिदीला म्हणाला, जर तुम्ही भारताला तुमचा शत्रू मानत असाल तर कधीही भारतीय मीडियामध्ये जाऊन कोणतेही वक्तव्य करू नका. खरं तर, दानिश कनेरिया शत्रू देशांमध्ये जाऊन त्यांच्या विरोधात अशा प्रकारचे वक्तव्य करतो, ज्यामुळे धार्मिक भावना भडकावल्याचं आफ्रिदीने म्हटलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना कनेरियाने हे वक्तव्य केले आहे.
कनेरियाने आफ्रिदीच्या वक्तव्याशी संबंधित एक बातमी ट्विट ( Kaneria tweet related to Afridi statement ) करत लिहिले, भारत आमचा शत्रू नाही. धर्माच्या नावाखाली लोकांच्या भावना भडकावणारे आमचे शत्रू आहेत. जर तुम्ही भारताला आपला शत्रू मानत असाल, तर कोणत्याही भारतीय मीडिया चॅनलवर कधीही जाऊ नका. यानंतर स्वत:च्या ट्विटवर कमेंट करताना दानिश कनेरियाने लिहिले की, जेव्हा त्याने जबरदस्तीने धर्मांतराच्या विरोधात आवाज उठवला, तेव्हा त्याची कारकीर्द संपुष्टात येईल, अशी धमकी देण्यात आली.
काय आहे प्रकरण -दानिश कनेरियाने भारतीय प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शाहीद आफ्रिदीने हिंदू असल्यामुळे आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचे सांगितले होते. त्याचवेळी त्याच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. याला प्रत्युत्तर देताना शाहिद आफ्रिदीने ( Former cricketer Shahid Afridi ) पाकिस्तान मीडियाशी संवाद साधताना सांगितले की, तो स्वत: त्यावेळी इस्लामला पूर्णपणे समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. या सर्व गोष्टी सांगण्यापूर्वी त्याच्यासारख्या व्यक्तीने त्याच्या चारित्र्याकडे लक्ष दिले पाहिजे. स्पॉट फिक्सिंग करून देशाचे नाव बदनाम केले. आता पैसा आणि लोकप्रियतेच्या हव्यासापोटी तो माझ्यावर गंभीर आरोप करत आहेत.