कराची : रविवारी पाकिस्तान सुपर लीगचा अंतिम सामना ( Pakistan Super League final ) पार पडला आहे. हा अंतिम सामना लाहोर कलंदर्स आणि मुल्तान सुल्तान्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात लाहोर कलंदर्सने मुल्तान सुल्तान्सचा 42 धावांनी पराभव केला. त्याचबरोबर पीएसएलच्या ट्रॉफीवर शाहीन आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली नाव ( Lahore Calendars won the PSL title ) कोरले. तसेच ही ट्रॉफी जिंकत शाहीन आफ्रिदीने आपल्या नावावर एका विक्रमाची नोंद केली आहे.
शाहीन आफ्रिदीने वयाच्या 21 वर्षी लाहोर कलंदर्स संघाचे नेतृत्व ( Lahore Calendars captain Shahin Afridi ) करताना जेतेपद पटकावले आहे. अशी कामगिरी करणारा तो सर्वात युवा कर्णधार ठरला आहे. त्याच्या अगोदर हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव स्मिथच्या ( Former Australia captain Steve Smith ) नावावर होता. त्याने 2012 मध्य वयाच्या 22 व्या वर्षी सिडनी सिक्सर्स संघाला आपल्या नेतृत्वाखाली जेतेपद मिळवून दिले होत. त्याने हा कारनामा बिग बॅश लीगमध्ये ( Big Bash League ) केला होता.