दुबई - भारताची युवा स्टार महिला क्रिकेटर शेफाली वर्माने आयसीसी टी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थान कायम राखलं आहे. दुसरीकडे अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत न्यूझीलंडची सोफी डिवाईन इंग्लंडच्या नताली स्किवर सोबत संयुक्तपणे अव्वलस्थानी पोहोचली आहे.
आयसीसीने महिला टी-20 ची क्रमवारी जारी केली आहे. यात शेफाली वर्मा 759 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाची बेथ मूनी 744 गुणांसह दुसऱ्या तर भारतीय संघाची स्टार सलामीवीर स्मृती मंधाना 716 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाची मेग लेनिंग 709 गुणांची कमाई करतचौथ्या स्थानी आहे. सोफी डिवाईनची क्रमवारी एका स्थानाने सुधारली आहे. ती 689 गुणांसह पाचव्या स्थानावर सरकली आहे.
सोफीने इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सामन्यात चांगली कामगिरी केली होती. याचा तिला फायदा झाला आहे. इंग्लंडविरुद्ध तिने फलंदाजीत 50 धावा आणि गोलंदाजीत 2 गडी बाद करत अष्टपैलू कामगिरी नोंदवली होती. याच प्रदर्शनाच्या जोरावर तिने अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत इंग्लंडच्या नताली स्किवरसोबत संयुक्तपणे अव्वलस्थानी पटकावलं आहे.
दीप्ती शर्माची क्रमवारी सुधारली