ब्रिस्टोल - इंग्लंड महिला क्रिकेट संघ आणि भारतीय महिला क्रिकेट संघ यांच्यात ब्रिस्टोलच्या मैदानात कसोटी सामना रंगला आहे. भारतीय संघ या सामन्यात पिछाडीवर असून इंग्लंडने भारताला फॉलोऑन दिला आहे. परंतु या सामन्यात भारतीय संघाची युवा सलामीवीर शफाली वर्माने एक खास विक्रम आपल्या नावे केला आहे.
महिला क्रिकेटमध्ये शफालीने एक कसोटी सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम केला आहे. तिला इंग्लंडविरुद्धच्या सुरू असलेल्या सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली. या सामन्यात शफालीने दोन्ही डावात मिळून ३ षटकार ठोकले. अशा विक्रम महिला क्रिकेट विश्वात अद्याप कोणत्याही खेळाडूला करता आलेला नाही. महिला क्रिकेटमध्ये खेळाडू एका सामन्यात एक किंवा दोन षटकार ठोकू शकले आहेत. परंतु शफालीने पहिल्याच सामन्यात तीन षटकार ठोकत हा विक्रम आपल्या नावे केला.