स्टर्लिंग (स्कॉटलंड): स्वतंत्र पुनरावलोकनामध्ये स्कॉटिश क्रिकेट अधिकारी संस्थात्मक वर्णद्वेषात गुंतलेले आढळले ( SC Officials found involved in Racial Scandal ) आहेत, ज्यामुळे खेळाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. यापूर्वी इंग्लंडमध्येही अशीच एक घटना समोर आली होती. स्कॉटलंडचा सर्वात यशस्वी गोलंदाज माजिद हक ( Bowler Majid Haq ) आणि त्याचा माजी सहकारी कासिम शेख ( Former colleague Qasim Shaikh ) यांच्या आरोपांच्या सात महिन्यांच्या तपासानंतर सोमवारी हे पुनरावलोकन प्रकाशित करण्यात आले. त्यात असे आढळून आले की, स्कॉटलंडमधील क्रिकेटची प्रशासकीय संस्था क्रिकेट स्कॉटलंड संस्थात्मक वर्णद्वेषाच्या 31 पैकी 29 निकषांमध्ये अपयशी ठरली.
Scottish Cricket : स्कॉटिश क्रिकेट अधिकारी अडकले वांशिक घोटाळ्यात - क्रिकेटच्या लेटेस्ट मराठी न्यूज
स्कॉटलंडचा सर्वात यशस्वी गोलंदाज माजिद हक ( Bowler Majid Haq ) आणि त्याचा माजी सहकारी कासिम शेख यांच्यावरील आरोपांच्या सात महिन्यांच्या तपासानंतर सोमवारी हे पुनरावलोकन प्रकाशित करण्यात ( Racial Scandal ) आले.
हे मापदंड तपासाचे नेतृत्व करणाऱ्या सल्लागार कंपनीने सेट केले होते. उर्वरित दोन चाचण्यांमध्ये ही संस्था अंशतः यशस्वी झाली आणि संस्थात्मक वर्णद्वेषाच्या 448 घटनांची नोंद ( 448 incidents of racism recorded ) झाली. या तपासणीत शेकडो लोक पुढे आले आणि त्यांनी आपले अनुभव सांगितले. यादरम्यान, 68 वैयक्तिक प्रकरणे पुढील तपासासाठी संदर्भित करण्यात आली, ज्यात 15 लोक, दोन क्लब आणि एका प्रादेशिक संघटनेवर वर्णद्वेषाचे 31 आरोप आहेत. आरोपांमध्ये वांशिक छळ, अयोग्य भाषेचा वापर, सार्वजनिक शाळांमध्ये गोर्या मुलांना पसंती देणे आणि निवड प्रक्रियेतील पारदर्शकतेचा अभाव यांचा समावेश आहे.
हेही वाचा -Boxer Lovlina Alleges : बीएफआयने बॉक्सर लोव्हलिनाला शक्य ती सर्व मदत करण्याचे दिले आश्वासन