महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IND vs WI T20 Series : दुखापतीमुळे केएल राहुल टी-20 मालिकेतून बाहेर, 'या' धडाकेबाज फलंदाजाला मिळाली संधी - Wicketkeeper batsman Sanju Samson

विंडीज दौऱ्यावर टीम इंडियाला पाच सामन्यांची टी-20 ( India Vs West Indies ) मालिका खेळायची आहे. त्याचा पहिला सामना आज (29 जुलै) रात्री 8 वाजता त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर होणार आहे. टीम इंडियाचा स्टार सलामीवीर केएल राहुल तंदुरुस्त नसल्यामुळे वेस्ट इंडिज दौऱ्यातून बाहेर पडला आहे.

KL Rahul
केएल राहुल

By

Published : Jul 29, 2022, 5:51 PM IST

हैदराबाद : एकदिवसीय मालिकेत क्लीन स्वीप केल्यानंतर आता टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका ( 5 match T20 series against West Indies ) खेळणार आहे. या मालिकेसाठी उपकर्णधार केएल राहुलचा संघात समावेश करण्यात आला होता, मात्र ही मालिका सुरू होण्यापूर्वी दुखापतीमुळे तो बाहेर पडला ( Rahul out T20 series due to injury )आहे. आता मोठा निर्णय घेत बीसीसीआयने त्याच्या जागी एका स्टार खेळाडूचा समावेश केला आहे. हा खेळाडू काही चेंडूंमध्ये सामन्याचा चित्र बदलण्याची क्षमता राखतो.

बीसीसीआयने केएल राहुलच्या जागी संजू सॅमसनला संघात स्थान दिले ( Chance for Samson to replace Rahul ) आहे. संजू सॅमसन उत्कृष्ट फॉर्ममध्ये धावा करत आहे. त्याच्याकडे एवढी क्षमता आहे की तो काही चेंडूंमध्येच सामन्याचा चित्र बदलू शकतो. मैदानावर त्याची चपळता देखील शानदार आहे. त्याचे यष्टिरक्षण कौशल्यही अप्रतिम आहे. आता बीसीसीआयच्या वेबसाइटवर निवडलेल्या भारतीय संघात केएल राहुलच्या जागी संजू सॅमसनचे नाव येत आहे.

संजू सॅमसनचा ( Wicketkeeper-batsman Sanju Samson ) निवडकर्त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या भारताच्या एकदिवसीय संघात समावेश केला होता, परंतु त्याला टी-20 संघात स्थान मिळाले नव्हते. आता केएल राहुलच्या बाहेर पडण्याने त्याचे नशीब उघडले आहे. संजू सॅमसनने वेस्ट इंडिजविरुद्ध झंझावाती कामगिरी केली. तसेच या खेळाडूने आयर्लंड दौऱ्यावर आपल्या खेळीने सर्वांची मने जिंकली होती. ज्यामध्ये संजू सॅमसनने 77 धावांची धडाकेबाज खेळी साकारली होती.

T20 विश्वचषकातील संघात मिळू शकते स्थान -

काही महिन्यांनंतर भारतीय संघाला रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली T20 विश्वचषक ( T20 World Cup ) स्पर्धेत भाग घेणार आहे. अशा परिस्थितीत संजू सॅमसनने वेस्ट इंडिज दौऱ्यावर अप्रतिम कामगिरी केली, तर त्याची टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड होऊ शकते.

हेही वाचा -Ind Vs Wi 1st T20 : आम्ही कधीच पुराणमतवादी नव्हतो, कधी कधी आम्हाला T20 मध्ये पराभवाला जावे लागते सामोरे रोहित

ABOUT THE AUTHOR

...view details