महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL 2022 Updates : आगामी आयपीएल सामन्यांसाठी संजय बांगर यांचा कोहलीला पाठिंबा - क्रिकेटच्या बातम्या

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चे मुख्य प्रशिक्षक संजय बांगर यांनी पुन्हा एकदा सांगितले की, स्टार फलंदाज विराट कोहली ( Star batsman Virat Kohli ) ज्या वाईट अवस्थेतून जात आहे त्यातून लवकरच बाहेर पडेल. तो इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधील सामने जिंकण्यासाठी संघाला मदत करेल.

Virat Kohli
Virat Kohli

By

Published : Apr 27, 2022, 6:06 PM IST

पुणे:पुण्यात राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ( Royal Challengers Bangalore ) 29 धावांनी पराभव केला. मात्र या सामन्यात पुन्हा एकदा विराट कोहलीची बॅट तळपताना दिसली नाही. या सामन्यात ट्रेंट बोल्टच्या सुरुवातीच्या षटकात तो तीन वेळा बाद होण्यापासून वाचला होता. पण कोहली (9) प्रसिद्ध कृष्णाच्या ( Bowler Prasiddha Krishna ) शॉट लेंथ चेंडूला पुल मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. कोहलीने आयपीएल 2022 मध्ये मागील पाच डावांमध्ये 9, 0, 0, 12 आणि 1 धावा केल्या आहेत.

बंगळुरूचा सलग दुसऱ्या सामन्यात 29 धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर मुख्य प्रशिक्षक संजय बांगर ( Head Coach Sanjay Bangar ) म्हणाले की, स्टार फलंदाज लवकरच त्याच्या खराब फॉर्ममधून बाहेर पडेल आणि स्पर्धेच्या भविष्यातील सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करेल. बांगर म्हणाले, कोहली महान क्रिकेटर आहे. याआधीही त्यांनी अनेकदा या चढ-उतारांचा सामना केला आहे. मी त्याला जवळून पाहिले आहे. गेल्या दोन-तीन सामन्यांमधील खराब कामगिरीनंतर तो आगामी महत्त्वाच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करेल. तसेच तो आम्हाला जिंकण्यास मदत करेल. बांगर, ज्यांनी भारताचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे. त्यानी खुलासा केला की सराव सत्रात कोहलीशी केलेल्या संभाषणामुळे तो फॉर्ममध्ये नाही असे वाटत नाही.

तो पुढे म्हणाला, खरे सांगायचे तर, तो ज्या पद्धतीने तयारी करतो आणि स्वत:ला कम्फर्ट झोनपासून दूर ठेवतो त्याबद्दल आम्ही नेटमध्ये काही वेगळे बोलत नाही आहोत. हीच त्यांची चांगली गोष्ट आहे. कोहलीच्या खराब फॉर्ममधून बाहेर पडण्यासाठी मानसिक बळावर विश्वास व्यक्त केला. याआधी कर्णधार फाफ डू प्लेसिसनेही आगामी सामन्यांमध्ये कोहलीची सातत्यपूर्ण खराब कामगिरी करूनही त्याचे समर्थन केले आहे.

तो म्हणाला, "आम्ही गेल्या सामन्यानंतर यावर चर्चा केली, विराटने सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा विचार केला आहे. महान खेळाडू अशा प्रकारच्या गोष्टींमधून जातात आणि त्यांनाच खराब फॉर्ममधून मार्ग काढण्याची गरज असते.

अनुज रावतच्या जागी कोहलीला ( Virat Kohli ) सलामी देण्याच्या तर्काबद्दल विचारले असता डु प्लेसिस म्हणाला, “तो एक उत्कृष्ट क्रिकेटपटू असल्यामुळे त्याला सलामी देण्याची आमची कल्पना होती. तो लवकरच फॉर्ममध्ये येईल यासाठी आम्ही त्याला अजूनही पाठिंबा देतो. बंगळुरू सध्या नऊ सामन्यांतून 10 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. त्याचा पुढील सामना 30 एप्रिल रोजी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर गुजरात टायटन्सशी होणार आहे.

हेही वाचा -Sanjay Bangar Statement : आरसीबी पराभवातून लवकरच सावरेल - संजय बांगर

ABOUT THE AUTHOR

...view details