साउथम्पटन - भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला उद्या शुक्रवारपासून सुरूवात होणार आहे. या सामन्याची उत्सुकता जगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये पाहायला मिळत आहे. अंतिम सामन्याआधी भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची मुलाखत त्याची पत्नी संजना गणेशन हिने घेतली. बुमराहने या मुलाखतीत आपल्या आठवणींना उजाळा दिला.
संजना स्पोर्टस् टीव्ही अँकर आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच बुमराहने संजनाला मुलाखत दिली आहे. आयसीसीने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन बुमराहची मुलाखत शेअर केली आहे. संजनाने या अनोख्या मुलाखतीमधून इन्स्टाग्राम फोटोंमधून बुमराहाला आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांवर बोलतं केलं.
जसप्रीत बुमराह जेव्हा मुलाखतीसाठी स्टुडिओत आला तेव्हा त्याच्यासमोर संजना बसली होती. मुलाखत सुरू झाली तेव्हा बुमराहने कॅमेऱ्याकडे पाहू की तुझ्याकडे असा एक खट्याळ प्रश्न संजनाला विचारला. त्यावर संजानाने सुरवातीला म्हटलं की, कॅमेऱ्याकडे पाहा. नंतर तिनं सांगितलं की, तुझ्याकडे दोन्ही ऑप्शन आहेत. तु माझ्याकडे किंवा कॅमेऱ्याकडे पाहू शकतोस. यावर बुमराह म्हणाला, मी प्रयत्न करेन. यावेळी दोघांनाही हसू आवरले नाही. मुलाखतीमध्ये बुमराहने फोटोवरुन त्या क्षणांची आठवण सांगतली. दरम्यान, बुमराहची ही मुलाखत तुफान व्हायरल होत आहे. त्याचे चाहते या मुलाखतीवर लाईक कमेंटचा वर्षाव करत आहेत.
हेही वाचा -WTC Final: भारताने ICC कडे केली न्यूझीलंडच्या खेळाडूंची तक्रार; जाणून घ्या कारण
हेही वाचा -WTC Final : न्यूझीलंडला फायदा पण आम्हीही तयार - रहाणे