हैदराबाद :दुबई टेनिस चॅम्पियनशिपमध्ये टेनिस स्टार सानिया मिर्झाने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती घेतली. आता ती तिच्या मूळ गावी हैदराबादमध्ये फेअरवेल प्रदर्शनी सामना खेळणार आहे. सानिया मिर्झा आज अखेरचा निरोप सामना हैदराबादच्या लाल बहादूर स्टेडियमवर खेळणार आहे. सानिया मिर्झा म्हणाली, 'मी माझा शेवटचा टेनिस सामना खेळणार आहे, जिथे मी 18-20 वर्षांपूर्वी खेळायला सुरुवात केली होती.
सानिया सहा वेळा ग्रँडस्लॅम जिंकले :ऑलिम्पिक वेबसाइटनुसार, सानिया म्हणाली, 'मी माझे सर्व मित्र, माझे कुटुंब आणि चाहत्यांसमोर शेवटचे खेळणार आहे. सानिया मिर्झाने सहा वेळा ग्रँडस्लॅम जिंकले आहे. निवृत्तीदरम्यान ती दोन प्रदर्शनीय सामने खेळणार आहे. पहिल्या सामन्यात अभिनेते, क्रिकेटपटू आणि टेनिसपटू सहभागी होणार आहेत. दोन्ही संघांपैकी एका संघाचे नेतृत्व सानिया करणार आहे, तर दुसऱ्या संघाचे नेतृत्व भारतीय टेनिसपटू रोहन बोपना करणार आहे. सानिया मिर्झा-रोहन बोपना आणि इव्हान डोडिग-बेथनी मॅटेक-सँड्स यांच्यात मिश्र दुहेरीचा टेनिस सामना होणार आहे.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर :बोपना, सँड्स आणि डोडिग हे सानिया मिर्झासोबत यापूर्वीही सामने खेळले आहेत. सानिया मिर्झा आणि रोहन बोपना बराच काळ एकत्र खेळले आहेत. रिओ ऑलिम्पिक 2016 च्या मिश्र दुहेरीत दोघांची जोडी चौथ्या क्रमांकावर होती. या दोघांची जोडी वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली होती, ज्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. सानियाने तिच्या कारकिर्दीत 44 डब्ल्यूटीए चॅम्पियनशिप (दुहेरीत 43 आणि एकेरीमध्ये) जिंकल्या. महिला दुहेरीच्या डब्ल्यूटीए क्रमवारीतही ती जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे.
अनेक स्टार्स उपस्थित राहण्याची शक्यता : सानिया मिर्झाच्या गुडबाय गालामध्ये बॉलिवूड आणि टॉलिवूड स्टार्ससह अनेक स्टार्स उपस्थित राहण्याची शक्यता आहे. टेनिस स्टार सानियाने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसोबत लग्न केले आहे. त्यांना एक मुलगा इझान देखील आहे. डब्ल्यूपीएल 2023 च्या पहिल्या सीझनमध्ये सानिया रॉयल चॅलेंजर्स बंगलोरची मार्गदर्शक आहे.
हेही वाचा : Shane Warne Death Anniversary : शेन वॉर्नच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त सचिनने केली भावनिक पोस्ट, म्हणाला...