महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Sachin Tendulkar : क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी! पुन्हा एकदा रंगणार सचिन विरुद्ध अख्तर सामना, जाणून घ्या कधी आणि कुठे - Sachin Tendulkar Road Safety World Series

भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज शोएब अख्तर यांच्यात पुन्हा एकदा सामना रंगणार आहे. ईएसपीएनने दिलेल्या माहितीनुसार, रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजच्या यंदाच्या हंगामात प्रथमच पाकिस्तानचा संघही सहभागी होणार आहे.

Sachin Tendulkar Shoaib Akhtar
सचिन विरुद्ध अख्तर

By

Published : Aug 5, 2023, 5:35 PM IST

नवी दिल्ली :महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सचिन पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजची तिसरी आवृत्ती यावेळी इंग्लंडमध्ये सप्टेंबरमध्ये आयोजित केली जाणार आहे. सचिन तेंडुलकर या मालिकेत खेळताना दिसणार आहे. नोव्हेंबर 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सचिन रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजच्या मागील दोन सीझनमध्ये इंडिया लिजेंड्स संघाकडून खेळला होता.

यंदा प्रथमच पाकिस्तानचा संघ सहभागी होणार : जगभरातील माजी दिग्गज आंतरराष्ट्रीय खेळाडू दरवर्षी होणाऱ्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये खेळतात. या वर्षी सप्टेंबरमध्ये या स्पर्धेचा तिसरा हंगाम खेळवला जाणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यंदा प्रथमच या स्पर्धेत पाकिस्तानचा संघही सहभागी होणार आहे. आतापर्यंत ही स्पर्धा भारतात खेळली गेली होती. परंतु आगामी हंगाम इंग्लंडमध्ये आयोजित केला जाणार आहे. या स्पर्धेच्या आयोजनाला इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाकडून होकार मिळाला आहे.

सचिन-अख्तर सामना पाहायला मिळणार : रिपोर्ट्सनुसार, जर पाकिस्तानचा संघ या स्पर्धेत सहभागी होत असेल तर पुन्हा एकदा सचिन तेंडुलकर आणि पाकिस्तानचा दिग्गज वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यांच्यात सामना पाहायला मिळू शकतो. पाकिस्तानचा आणखी एक दिग्गज गोलंदाज वसीम अक्रम देखील या स्पर्धेत सहभागी होण्याची शक्यता आहे. 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला अख्तर आणि सचिनचे क्रिकेटमधील द्वंद जगभरात प्रसिद्ध होते. मैदानावर या दोघांमध्ये बरेच खटके उडाले आहेत. मात्र मैदानाबाहेर त्यांनी कायमच एकमेकांप्रती आदर व्यक्त केला. त्यामुळे आता या दोघांमध्ये पुन्हा एकदा सामना रंगणार असल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये याबद्दल विशेष उत्सुकता आहे.

स्पर्धेत भारतीय संघाचे वर्चस्व : रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये आत्तापर्यंत भारतीय संघाचेच वर्चस्व राहिले आहे. सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली इंडिया लिजेंड्स संघ स्पर्धेच्या दोन्ही हंगामात चॅम्पियन ठरला आहे. आत्तापर्यंतचे दोन्ही हंगाम भारतातच खेळले गेले असल्याने भारतीय संघाला त्याचा फायदा मिळाला. मात्र आता यंदाचा हंगाम इंग्लंडच्या उसळत्या खेळपट्ट्यांवर खेळला जात असल्याने जेतेपदाचा बचाव करणे भारतासाठी आव्हानात्मक असेल.

हेही वाचा :

  1. RCB Head Coach : आरसीबीला मिळाले नवे हेड कोच, बांगर-हसन जोडीची हकालपट्टी
  2. BCCI Media Rights : टीम इंडियाचे सामने कोणत्या चॅनलवर दिसणार? बीसीसीआयने काढले टेंडर
  3. Jasprit Bumrah : अखेर प्रतीक्षा संपली!, जसप्रीत बुमराहचे टीम इंडियात धडाक्यात पुनरागमन

ABOUT THE AUTHOR

...view details