मुंबई - जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने सांघिक खेळ करत भारताचा ८ गडी राखून पराभव केला आणि विजेतेपद पटकावले. न्यूझीलंडच्या विजयात वेगवान गोलंदाज काइल जेमिसनने अष्टपैलू भूमिका निभावली. आता भारताचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरने काइल जेमिसन याच्याविषयी एक भाकित केलं आहे.
सचिन म्हणाला, काइल जेमिसन एक दमदार अष्टपैलू खेळाडू आहे. पुढे जाऊन तो जगातील अग्रणी अष्टपैलू खेळाडूंपैकी एक होईल. जेव्हा मी त्याला न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदा पहिलो. त्याने मला प्रभावित केलं.
इंग्लंडच्या खेळपट्टीवर जेमिसन धोकादायक का ठरला? याचा उलगडा देखील सचिनने यावेळी केला. याविषयी सचिन म्हणाला, 'तुम्ही जर जेमिसनची गोलंदाजी पहिली तर तो खूप उंच आहे आणि स्विंग पेक्षा तो चेंडू सीम करणे जास्त पसंत करतो. टीम साऊथी, ट्रेंट बोल्ट आणि नील वॅग्नर यांच्या तुलनेत तो वेगळा गोलंदाज आहे.'
हेही वाचा -IND VS SL : मराठी गाण्यावर सूर्यकुमार यादवचा वर्कआऊट, पाहा व्हिडीओ